लघु अनिवार्य प्रार्थना (#12497)

*(दिवसात एकदा हात आणि तोंड धुवून बहाउल्लाह यांच्या समाधीच्या दिशेला (ईशान्य) तोंड करून उभे राहून दुपारी १२ ते ६ च्या दरम्यान म्हणावी.)
	हे माझ्या परमेश्वरा, तुला जाणावे आणि तुझी उपासना करावी यासाठी तू मला निर्मिलेस यास मी साक्ष आहे. मी ह्या क्षणी माझी निर्बलता आणि तुझे सामर्थ्य, माझे  दारिद्र्य आणि तुझी संपन्नता स्वीकारतो. 
संकटी सहाय्यक, स्वयंभू असा तुजविण अन्य कोणी परमेश्वर नाही.

-Bahá'u'lláh
-----------------------

